पुणे

जकरायाचा सी बी जी प्लांट

CD

BEG26B01878
वटवटे (ता. मोहोळ) ः जकराया साखर कारखान्यातील ड्रायरचे पूजन करताना कार्यकारी संचालक सचिन जाधव, राहुल जाधव व अन्य.

जकरायाच्या सीएनजी प्रकल्पाचे देशात सर्वाधिक उत्पादन
सचिन जाधव यांची माहिती; अत्याधुनिक ड्रायरमुळे क्षमता वाढणार

सकाळ वृत्तसेवा
बेगमपूर ता. ६ः जकराया साखर कारखान्याने सीबीजी प्लाटची उत्पादन क्षमता व गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्याधुनिक ड्रायर मशिन बसविली आहे. जकरायाचा हा प्रकल्प देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर सीएनजीचे उत्पादन करणारा ठरला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली.
वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखान्यात सिबिजी प्लांटसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ड्रायर मशिन बसविण्यात आली आहे. या मशिनचे पूजन अध्यक्ष सचिन जाधव व पूर्णवेळ संचालक राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर कुबेरदास कलुबर्मे, ड्रायर अभियंता नितेश मोदी (गुजरात), सीबीजी प्लांट इनचार्ज परशुराम कोळी, प्रवीण पाटील, प्रशांत देवकते आदी जण उपस्थित होते. यावेळी सचिन जाधव यांनी जकराया साखर कारखान्यांने साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मितीला ही प्राधान्य दिले आहे. या पार्श्वभूमीवरच जकरायाच्या माध्यमातून सीएनजीचे देशात सगळ्यात मोठे उत्पादन होत आहे. त्यात आणखी वाढ व्हावी व गुणवत्तापूर्ण उत्पादन व्हावे, यासाठी अत्याधुनिक ड्रायर बसविण्यात आल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT