the basic work started  through the land bank
the basic work started through the land bank 
पुणे

जम्मु काश्मीरमध्ये लँड बँक तयार करून मूलभूत सुविधा देण्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी लँड बँक तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये उभारण्यात येत असल्याची माहिती, काश्मीरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी सोमवारी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने डॉ. डोईफोडे यांच्याशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण, सेवा आणि शेती या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यास सर्वाधिक जण इच्छुक असल्याचे दिसते. याबाबत त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी देखील करण्यात आली आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांमध्ये प्रत्येक कामांना  सुरुवात होईल, असा विश्वास डॉ. डोईफोडे यांनी व्यक्त केला.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येथे काही बंधने ठेवण्यात आली होती. मात्र सामान्यांचा अधिकारांवर गदा येणार नाही, याची काळजी देखील घेण्यात आली होती. सध्या येथे अत्यंत शांतता असून येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT