Jayka-Project Sakal
पुणे

मर्जीतील ठेकेदारासाठी अट्टाहास?

‘जायका’च्या निविदा प्रक्रियेत एका कंपनीला वाचविण्याचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रकल्पाला विलंब झाला तरी चालेल, परंतु मर्जीतील ठेकेदार कंपनीलाच काम मिळाले पाहिजे, ही मनोवृत्ती जायका प्रकल्पात देखील दिसून येऊ लागली आहे. त्रुटींचे पूर्तता करण्याऐवजी एक ठेकदार कंपनी महापालिकेला आपल्या तालावर नाचवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रकल्पाला विलंब होत असून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र सरकार आणि जायका यांच्या मदतीने महापालिकेने या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी पूर्वी काढलेल्या निविदा जादा दराने आल्याची ओरड करीत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी त्या रद्द करण्यास भाग पडले. आता नव्याने काढलेल्या फेरनिविदेतही मर्जीतील ठेकेदार कंपनीला हे काम मिळण्यासाठी प्रशासन कशा प्रकारे काळजी घेत आहे, याची माहिती ‘सकाळ’च्या हाती आली आहे.

या प्रकल्पासाठी सहा ठेकेदार कंपन्यांनी भरलेल्या निविदा २४ ऑगस्ट रोजी उघडण्यात आल्या. निविदा भरलेल्या कंपन्यांची पात्रता आणि तांत्रिक छाननी करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीकडून सुरू आहे. या दरम्यान चार कंपन्यांच्या पात्रता निकषांमध्ये काही त्रुटी असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेने संबंधित कंपन्यांना या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ६ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामध्ये चारपैकी तीन कंपन्यांनी त्या अटींची मुदतीत पूर्तता केली. परंतु, एका कंपनीने मुदतीत पूर्तता केली नाही. तेव्हा ७ सप्टेंबर रोजी महापालिकेने पुन्हा त्या कंपनीला पत्र पाठवून ९ सप्टेंबरपर्यंत पुर्तता करण्याच्या सूचना दिल्या. तेव्हा या कंपनीने यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मागितली. कंपनीकडून या त्रुटी पूर्तता होण्यापूर्वीच १४ सप्टेंबर रोजी त्याच कंपनीला पुन्हा पत्र पाठवून १५ सप्टेंबरपर्यंत त्रुटींची पूर्तता करण्याची संधी दिली. तरीही कंपनीने अटींची पूर्तता न करता पालिकेला उलटे पत्र पाठवून ७ व १४ सप्टेंबर रोजी दिलेल्या पत्रांतील अटींची पूर्तता करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यासाठी नवीन पत्र दिले आहे.

दोनदा पत्र देऊनही त्रुटींची पूर्तता नाही

चारपैकी तीन कंपन्यांनी नियमांचे पालन करीत दिलेल्या मुदतीत त्रुटींची पूर्तता केली. परंतु, एका ठेकेदार कंपनीला दोनदा पत्र देऊनही अद्याप त्रुटींची पूर्तता करण्यात आली नाही. या कंपनीला बाद करण्याऐवजी तिला वाचविण्यासाठी प्रशासनातील अधिकारी काम करीत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT