jee advanced criteria  esakal
पुणे

JEE Advanced 2025: आयआयटीची तयारी करणाऱ्या तरुणांना दिलासा ! ‘जेईई ॲडव्हान्स’ देता येणार तीनदा, काय आहे अट ?

JEE Advanced 2025 eligibility criteria announced: सलग तीन वर्षांत जास्तीत जास्त तीन वेळा विद्यार्थी ‘जेईई ॲडव्हान्स’ची परीक्षा देऊ शकणार आहेत. त्यामुळे आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

CD

पुणे, ता. ७ : देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) यांसह नामांकित शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी होणारी ‘जेईई ॲडव्हान्स’ ही परीक्षा आता विद्यार्थ्यांना तीनदा देता येणार आहे. या परीक्षेसंदर्भात नव्याने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आता सलग तीन वर्षांत जास्तीत जास्त तीन वेळा विद्यार्थी ‘जेईई ॲडव्हान्स’ची परीक्षा देऊ शकणार आहेत. त्यामुळे आयआयटी, एनआयटीमधील प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

देशातील या नामांकित संस्थांमध्ये अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, यासाठी भारतीय विद्यार्थ्यांसह परदेशस्थ भारतीय (ओसीआय), भारतीय वंशाचे नागरिक (पीआयओ) हे विद्यार्थीदेखील ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षा देतात. बी.ई. आणि बी.टेक अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या जेईई मेन या परीक्षेतून जवळपास अडीच लाख विद्यार्थी हे जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतात.

यात सर्वसाधारण प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा विविध प्रवर्गांच्या आरक्षणानुसार जेईई मेन परीक्षेत अव्वल ठरलेले विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत (आयआयटी) घेण्यात येते. यंदा ही परीक्षा आयआयटी कानपूर यांच्यामार्फत होणार आहे.

हे लक्षात ठेवा

आतापर्यंत विद्यार्थ्यांना केवळ दोनदा जेईई ॲडव्हान्स परीक्षा देण्यासाठी संधी देण्यात येत होती. परंतु, ‘आयआयटी कानपूर’ने नुकत्याच जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आता विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षांत जास्तीत जास्त तीन वेळा ही परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. परीक्षेच्या पात्रता निकषांबद्दल ‘https://jeeadv.ac.in/index.html’ या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

पात्रता निकष

  • विद्यार्थ्याचा जन्म एक ऑक्टोबर २००० रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा

  • एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पाच वर्षांची सूट

  • अशा विद्यार्थ्याचा जन्म एक ऑक्टोबर १९९५ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा

  • विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अनिवार्य विषय घेणे आवश्यक

  • जे विद्यार्थी २०२२ मध्ये किंवा त्यापूर्वीच्या बारावी परीक्षेत पहिल्यांदा बसले होते ते पात्र ठरणार नाहीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT