पुणे

जेऊरचा काशिविश्वेश्वर रथोत्सव उद्या; भाविकांची उपस्थितीत आकर्षक आतषबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

CD

JEU26B08588
फोटो : श्री काशिविश्वेश्वर

जेऊरचा काशिविश्वेश्वराचा आज रथोत्सव
विद्युत रोषणाईने सजणार भव्य रथ; आतषबाजी, नाटक अन् कुस्त्यांचे आयोजन

अक्कलकोट, ता. १३ : जेऊर (ता. अक्कलकोट) येथील ग्रामदैवत श्री काशिविश्वेश्वर यांचा पारंपरिक रथोत्सव शनिवारी (ता. १४) रात्री आठ ते अकरा या वेळेत होणार असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली.
दिवाळी पाडव्यानंतर पाचव्या दिवशी पांडवपंचमी अर्थात कडपंचमीला हा उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या यात्रेला मंगळवारी (ता. १०) सुरुवात झाली असून, पाडव्यापासून मानकरी म्हेत्रे परिवाराच्या घरापासून मंदिरापर्यंत छोट्या रथाची (उचई) मिरवणूक काढली जात आहे. ही परंपरा सलग पाच दिवस सुरू असते. यानिमित्त स्पर्धात्मक कलगीतुरा कार्यक्रमही होतात.

यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या रथाची विद्युत रोषणाई आणि हारफुलांनी सजावट करण्यात येणार आहे. रथोत्सवातील पारंपरिक मानानुसार परदेशी मठ, उंबराणी बंधू, हत्तरसंग, फुलारी, हरिहर आणि पाटील परिवारांकडे नंदीध्वजांचा मान आहे. रथावरील अंडाकृती भागाचा मान सुतार परिवाराकडे, छत्रीचा वग्गे परिवाराकडे, कळसाचा पुजारी परिवाराकडे, तर कुंभाचा मान स्वामी परिवाराकडे आहे. रथपूजा व अर्चेचा मान सुतार आणि लोहार परिवाराकडे आहे.
रथोत्सवानंतर सोलापूर येथील निंबाळकर आणि देवस्थान समितीच्या वतीने दारूकामाची आतषबाजी होणार आहे. रात्री गोंधळी समाजाचा पारंपरिक मानाचा नाटकाचा कार्यक्रम आणि कन्नड सामाजिक नाटक सादर होईल. रविवारी (ता. १५) सायंकाळी जंगी कुस्त्यांच्या फडाने यात्रेची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

आयुष्मान कार्डधारकांना धक्का! आता ११२ आजारांवरील उपचार खासगी रुग्णालयांत होणार नाहीत, मोदी सरकारचा प्रस्ताव

JEE Advanced 2027 ची तारीख जाहीर; 23 मे रोजी होणार परीक्षा, IIT दिल्लीकडे आयोजनाची जबाबदारी

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

SCROLL FOR NEXT