Crime sakal
पुणे

Pune Crime : बॅंकेच्या लॉकरमधून अडीच कोटींचे दागिने लंपास; बॅंक व्यवस्थापिका, सराफासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बँक खातेदाराच्या लॉकरमधून दोन कोटी ७८ लाख रुपयांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांसह रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बँक खातेदाराच्या लॉकरमधून दोन कोटी ७८ लाख रुपयांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांसह रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका बँकेच्या व्यवस्थापिका आणि सराफासह तिघांविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी यश केशवलाल कपूर (वय ४७, रा. सोपानबाग, पुणे) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापिका नयना अजवानी, सुरेंद्र शहानी आणि सराफा व्यावसायिक सतीश पंजाबी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लष्कर भागातील अरोरा टॉवर्स इमारतीत पंजाब नॅशनल बँकेची शाखा आहे. कपूर यांनी दोन महिन्यांपूर्वी लॉकर उघडून तपासणी केली. तेव्हा लॉकरमध्ये हिरेजडीत दागिने, रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे सुस्थितीत होती. त्यानंतर ते सहा सप्टेंबर रोजी बँकेत गेले. तेव्हा १३ ऑगस्टला शहानी यांनी कपूर यांचे लॉकर परस्पर उघडल्याची माहिती मिळाली.

लॉकरमधून साडे नऊ लाखांची रोकड, हिरेजडीत सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज परस्पर काढून घेण्यात आला. त्यानंतर पंजाबीने कोणतीही शहानिशा न करता ते दागिने वितळविले. परंतु याबाबत अजवानी यांनी कोणतीही माहिती दिली नाही, असे कपूर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

या संदर्भात माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त दीपक निकम आणि वरिष्ठ निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी बँकेस भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल दांडगे करीत आहेत.

आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी -

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले नयना अजवानी आणि सतीश पंजाबी यांना मंगळवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश अमित कुलकर्णी यांनी त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. २७) पोलिस कोठडी सुनावली आहे. मूळ फिर्यादी कपूर यांच्यावतीने युक्तिवाद करत ॲड. अंगद गील, ॲड. ध्वनी शहा आणि ॲड. प्रणाली मून यांनी आरोपींना जास्तीत पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT