Jica Sakal
पुणे

‘जायका’च्या निविदेला आठवड्याभराची मुदतवाढ

पुणे शहरातील मैलापाण्यावर शुद्धीकरण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जायका’ प्रकल्पाच्या निविदा भरण्यास आणखी आठवडाभराची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील मैलापाण्यावर (Drainage Water) शुद्धीकरण (Purification) करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जायका’ प्रकल्पाच्या (Jica Project) निविदा (Tender) भरण्यास आणखी आठवडाभराची अंतिम मुदत देण्यात आली आहे. युरोपमध्ये कोरोनाची साथ वाढल्याने प्रस्ताव सादर करण्यासाठी अडचणी येत असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती, त्यानुसार आता एक आठवडा मुदत वाढवली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

मुळा-मुठा नदीत येणारे मैलापाणी शुद्ध करण्यासाठी जपान येथील ‘जायका’ कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प केला जाणार आहे. २०१५ ला प्रकल्प मंजूर करण्यात आला, पण निविदा प्रक्रियेत अडकलेला हा प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. यामुळे याचा खर्च वाढून ९९५ कोटी वरून १५११ कोटीवर गेला आहे. महापालिका प्रशासनाने ठेकेदारांच्या सोईने नियमात केलेले बदल, तांत्रिक चुका अशा एक हजारपेक्षा चुका प्रस्तावात होत्या. त्यामुळे प्रकल्पास उशीर झाला. या चुका दुरुस्त झाल्यानंतर या कामासाठी १५कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यांना निविदा भरण्यासाठी १७ आॅगस्ट ही शेवटची तारीख होती. त्यानंतर तांत्रिक छाननी समिती स्थापन करून निविदांची छाननी प्रक्रिया केली जाईल.

दरम्यान, युरोपात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने निर्बंध लादण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यास उशीर होणार असल्याने सर्व १५ कंपन्यांनी चार आठवडे मुदतवाढ द्यावी अशी मागणी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने चार आठवड्यास नकार देत दोन आठवड्याची मुदत देण्याची तयारी दर्शविली. पण ‘जायका’कडून एक आठवडा मुदतवाढ मिळेल असे स्पष्ट केले आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘‘जायका प्रकल्पासाठी निविदा भरण्यासाठी १७ आॅगस्ट शेवटची तारीख होती, पण युरोपात कोरोनाची साथ वाढल्याने सर्व १५ कंपन्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आजच एका आठवड्याची मुदत वाढविण्याचा निर्णय जायकाने घेतला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT