UPR26B07542
पंढरपूर ःयेथील जिजामाता उद्यानातील खेळणी साहित्याची पाहणी करताना मनसे नेते दिलीप धोत्रे व इतर पदाधिकारी.
जिजामाता उद्यान उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात
मनसेचे दिलीप धोत्रे यांचा काम निकृष्ट झाल्याचा आरोप;
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २७ ः येथील जिजामाता उद्यानाचे काम निकृष्ट झाले असून, उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, संबंधित कामाची व ठेकेदाराची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे. या संदर्भात नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही श्री. धोत्रे यांनी सांगितले. यामुळे हे उद्यान उद्घाटनापूर्वीच वादात सापडले आहे.
येथील जिजामाता उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. वर्षभरापासून काम सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी काम पूर्ण झाले आहे. दरम्यान दिलीप धोत्रे यांनी या उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उद्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप केला आहे.
उद्यानाच्या कामाबाबत श्री. धोत्रे यांनी सांगितले, उद्यानातील पेव्हींग ब्लॉक, कंपाउंड वॉल तसेच इतर कामांच्या गुणवत्ता सुमार दर्जाची आहे. जुन्याच खेळण्यांना रंगरंगोटी करून नवीन असल्याचे दाखविण्यात आले. पेव्हींग ब्लाॅकच्या खाली खडी न टाकताच बसविण्यात आले आहेत. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच ब्लाॅक उखडून पडले आहेत. उद्यानावरती केलेला खर्च ठेकेदाराच्या घशात गेला आहे. येथील कामाची चौकशी करून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.