मार्केट यार्ड, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जीतो ॲपेक्सने मलेशियात आयोजित केलेली ‘पॅट्रॉन मेंबर्स कॉन्क्लेव्ह’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जीतो ॲपेक्सचे चेअरमन पृथ्वीराज कोठारी व राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ही जैन समाजातील उद्योजक, व्यापारी व व्यावसायिक लोकांची सामाजिक संस्था आहे. संपूर्ण भारतासह विदेशातही जीतोच्या शाखा आहेत. येत्या १४, १५ व १६ जुलैला मलेशियात पॅट्रॉन सदस्यांची कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली होती. यात १२०० जण सहभागी होणार होते. दरम्यान, अमेरिका-इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशहिताला प्राधान्य देऊन देशातील नागरिकांनी इंधनाची बचत करण्याबरोबरच परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भंडारी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.