job news New self-certification is required for teacher recruitment process pune  esakal
पुणे

शिक्षकभरतीच्या प्रक्रियेसाठी नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे आवश्यक

शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी दिलेल्या, तसेच पोर्टलवर नोंद केलेल्या सर्वच उमेदवारांना नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे, बदल करणे याची सुविधा शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली

- मीनाक्षी गुरव

पुणे : शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी दिलेल्या, तसेच  पोर्टलवर नोंद केलेल्या सर्वच उमेदवारांना नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करणे, बदल करणे याची सुविधा शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी १७ जुलैपर्यत मुदत देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी ‘https://mahateacherrecruitment.org.in’ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने शिक्षक भरतीच्या संकेतस्थळावर केले आहे.

मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ५६१ व्यवस्थापनांच्या दोन हजार ६२ रिक्त पदांसाठी पोर्टलमार्फत २ सप्टेंबर २०२१ रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी जागा नाहीत, अशा १९६ व्यवस्थापनांसाठी नव्याने प्राधान्यक्रम घेऊन पदभरतीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने १९६ व्यवस्थापनातील पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र नव्याने पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.

काही उमेदवारांकडून गैरसमजुतीने वा चुकीने पोर्टलवर स्व प्रमाणपत्रात चुकीची, अपूर्ण माहिती भरलेली असल्यामुळे या माहितीमध्ये बदल करण्याची उमेदवारांकडून मागील दोन वर्षापासून सातत्याने होत असलेली विनंती लक्षात घेता अशा उमेदवारांना स्व प्रमाणपत्रात योग्य तो बदल करण्याची सुविधा २४ सप्टेंबर २०२१पासून देण्यात आली होती. परंतु उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र अपडेट झालेले नाहीत. ते आता नव्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

१९६ व्यवस्थापनातील पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना स्व प्रमाणपत्र नव्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. नव्याने स्व प्रमाणपत्र पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांचा पदभरतीसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. स्व प्रमाणपत्रातील नोंद करण्याचा कालावधी संपल्यानंतर उमेदवारांकडून रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम घेण्यात येतील. उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन मुलाखतीसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल. याबाबत सूचना पोर्टलवर स्वतंत्रपणे देण्यात येतील, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

‘‘अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणीवरच प्रशासनाचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष भरती प्रक्रिया कधी होणार, याची प्रतीक्षा अभियोग्यता धारकांना आहे. शिक्षक पदभरतीबाबत सध्याच्या शिक्षण विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.’’

- संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT