पोल लावण्यावरून दोन गट भिडले
जोर्वे गावातील घटना; ४२ जणांविरोधात गुन्हा दाखल
संगमनेर, ता. २ जोर्वे (ता. संगमनेर) येथील गावात मुख्य चौकात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून विखे-पाटील आणि थोरात गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. ही घटना रविवारी (ता.१) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या ४२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांना न जुमानता बेकायदेशीर जमाव जमवून मुख्य चौकात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांना भिडले होते. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही त्याचे उल्लंघन झाले, असे पोलिस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंद्रजित पंडित थोरात, सुरेश जगन्नाथ थोरात, शरद नारायण थोरात, संजय निवृत्ती थोरात, राजेंद्र श्रीपत थोरात, वसंत मुरलीधर बोरकर, अक्षय गणपत दिघे, रमेश बाळासाहेब दिघे, मुकेश विठ्ठल काकड, सत्यजित प्रकाश थोरात, हर्षल निवृत्ती काकड, विठ्ठल नानासाहेब काकड, भाऊसाहेब बाबूराव दिघे, अभिषेक शरद थोरात, बादशहा रामकृष्ण बोरकर, अमित भास्कर थोरात, पुंजा यादव दिघे, कैलास पुंडलिक येवले, किसन हिरामण खैरे, दिगंबर नामदेव इंगळे, राहुल रवींद्र बोरकर, अनिल बाळासाहेब दिघे (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर), तसेच दुसऱ्या गटातील गोकूळ गणपत दिघे, नितीन सखाराम दिघे, विशाल भास्कर थोरात, वसंत ऊर्फ सचिन रामभाऊ दिघे, शरद गणपत दिघे, बाळासाहेब विठोबा जोर्वेकर, अनिकेत भारत जोर्वेकर, मयूर नामदेव गाडेकर, बाबासाहेब शिवाजी थोरात, रवींद्र नामदेव गाडेकर, बाळासाहेब कारभारी दिघे, दिलीप विठ्ठल काकड, प्रकाश वसंत काकड, गणेश बंडोपंत काकड, नंदू कारभारी थोरात, बाळासाहेब राधु इंगळे, मच्छिंद्र अंबादास पिंपळे, जितेंद्र कैलास दिघे, नवनाथ ऊर्फ भावड्या गंगाधर बलसाने, पंढरीनाथ दादाभाऊ बलसाने (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर), अशी गुन्हा दाखल झालेल्या ४२ जणांची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास काळे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.