JP Nadda prayer to 'Dagdusheth' Ganpati for BJP victory in Vidhan Sabha 2019
JP Nadda prayer to 'Dagdusheth' Ganpati for BJP victory in Vidhan Sabha 2019 
पुणे

भाजपच्या विजयाचे जे.पी.नड्डा यांनी घातले 'दगडूशेठ' गणपतीला साकडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो...आगामी निवडणुकीत यश व विजय मिळो...संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो...अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...'' अशा गणेशनामाच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केलेल्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने जे.पी.नड्डा यांचे यशोचित स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही.सतिश, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय पुण्याचे खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक यांसह स्थानिक नगरसेवक व भाजपा चे पदाधिकारीही उपस्थित होते. 

पुण्यामध्ये लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जे.पी.नड्डा यांनी प्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अभिषेक देखील केला. यामध्ये आगामी निवडणुकीत भाजपा ला यश मिळू देत, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले. त्यानंतर गणरायाची आरती देखील केली. ट्रस्टतर्फे महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन अशोक गोडसे व हेमंत रासने यांनी नड्डा यांचा सन्मान केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT