ऑटो क्‍लस्टर, चिंचवड - राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शेजवलकर आणि पुरस्कार्थी.
ऑटो क्‍लस्टर, चिंचवड - राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शेजवलकर आणि पुरस्कार्थी. 
पुणे

धाडस करा, यशस्वी व्हाल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा धाडस करा आणि उद्योगात उतरा. धाडस केले तरच, यशस्वी व्हाल,’’ असा सल्ला ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी तरुणांना दिला.

राज्य औद्योगिक विकास परिषदेतर्फे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. शेजवलकर बोलत होते. चिंचवडच्या ऑटो क्‍लस्टर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक मनोहर पारळकर, परिषदेचे अध्यक्ष सुदाम भोरे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आदी उपस्थित होते. पुरस्कारार्थींमध्ये जुन्नर येथील समर्थ रूरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे विश्‍वस्त वल्लभ शेळके (उद्योग सारथी), काकडे ग्रुपचे दिलीप काकडे (उद्योगरत्न), आर्च काम्पोनन्टसचे व्यवस्थापकीय संचालक डी. एस. राठोड (उद्योग विभूषण), एएसके इंडस्ट्रीजचे संचालक नेताजी पाटील (उद्योग भूषण), देहू येथील उद्योजक प्रमोद कुलकर्णी (उद्योग मित्र), भोसरीतील तरुण मयूर साठे (युवा उद्योजक) यांचा समावेश आहे. 

डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘‘आजचे युवक शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे लागतात. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी त्यांचे धडपड सुरू असते. मात्र सर्वांनाच सरकारी नोकरी मिळणे शक्‍य नाही. त्यामुळे धाडस करून तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू करायला हवेत. आजचे पुरस्कारार्थी उद्योजक तरुणांसाठी आदर्श आहेत. असा आदर्श निर्माण करण्यासाठी आपल्यातील वाईट सवयी सोडून द्यायला हव्यात. कारण वाईट सवयीमुळे सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक जीवन धूसर होत आहे.’’ पराळकर म्हणाले, ‘‘आज उद्योग बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान प्राप्त केलेल्यांनाच उद्योजक प्राधान्य देतात, असा आजचा सोहळा आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT