पुणे

पुण्यातील ‘जम्बो’तील सुविधांना मिळतेय बळ

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील ‘जम्बो’ चालविण्यात कमी पडलेल्या एजन्सीला हटवितानाच ‘जम्बो’तील सुविधांमध्ये बळ आणले जात असून, त्यातून रुग्णांना चांगले उपचार देण्यात येत आहेत. परिणामी, सलग दुसऱ्या दिवशी, म्हणजे मंगळवारी आणखी १६ रुग्ण उपचारानंतर ठणठणीत झाले आहेत. तर, ‘व्हेंटिलेटर’वरील रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे नव्या समितीने जाहीर केले. उपचारांसोबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या समुपदेशनासाठी ‘जम्बो’त कक्ष उभारला आहे. 

जम्बोतील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांत संवाद ठेवण्यासाठी सुरू केलेल्या ‘व्हिडिओ कॉलिंग’ सुविधेचे उद्‌घाटन महापौर मुरलीधर मोहोळ आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत झाले. 

रुग्णांना उपचार मिळत नसल्याने ‘लाइफलाइन’ या एजन्सीला बाजूला करीत ‘जम्बो’चा ताबा घेतल्यानंतर तेथील उपचार व्यवस्था सक्षम करण्यात येत आहेत. 

व्यवस्था सुधारतेय
नव्या डॉक्‍टरांची भरती झाल्यानंतर उपचाराचा परिणाम दिसत आहे. तक्रारी कमी होऊन रुग्ण बरे होत आहेत. ‘जम्बो’त दाखल होण्यासाठी चौकशी करणाऱ्याचे प्रमाण वाढले  आहे, असेही समन्वयक राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वयंसेवकांकडून समुपदेशन
कोरोनाची लागण झालेले रुग्ण धीर सोडत आहेत; तर त्यांच्या नातेवाइकांतही भीती असते. या अनुषंगाने रुग्ण आणि नातेवाइकांचे समुपदेशन करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे ३० स्वयंसेवक नेमले आहेत. ते २४ तास काम करणार असून तक्रारी, त्यानुसार रुग्ण, नातेवाइकांना मदत आणि सुमदेशनही करणार आहेत. तसेच, रुग्णांची प्रकृती जाणून घेण्यासाठी नातेवाइकांकरिता ‘जम्बो’च्या आवारात स्वतंत्र कक्ष उभारला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT