पुणे

जुन्नरला कांदा २८ रुपये किलो

सकाळवृत्तसेवा

जुन्नर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात गुरुवारी जुन्या कांद्याला दहा किलोस २८१ रुपये असा भाव मिळाला. 

गेल्या रविवारी (ता. १४) भाव वाढ झाल्याने आज आवक वाढली होती. बाजारात १४ हजार ६४२ कांदा पिशवीची आवक झाली. या कांद्यास प्रतवारीनुसार ७० ते १७० रुपये भाव मिळाला होता, तर ता. ७ रोजी १० हजार ४६ कांदा पिशवीची आवक झाली होती. त्यास प्रतवारीनुसार ५० ते १२० रुपये भाव मिळाला होता.

नवीन कांदा बाजारात न आल्याने भावात आणखी वाढ होईल आणि कांदा तीन हजार रुपयांचा टप्पा गाठेल, अशी शक्‍यता गृहीत धरून अनेकांनी अजून चाळीतून कांदा बाहेर काढलेला नाही. तालुक्‍यातील कांदा चाळीत सुमारे दोन ते तीन लाख टन कांदा साठवून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापैकी एक लाख टन कांदा अद्यापही शिल्लक असल्याचा अंदाज आहे.

कांद्याची देशभरातून मागणी वाढल्याने जुन्या कांद्याचे दर तेजीत आले आहेत. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असले तरी चाळीत कांदा खराब होऊ लागल्याने सुमारे ७५ टक्के कांदा शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने विक्री केला आहे. सध्या सुमारे वीस ते पंचवीस टक्के उन्हाळी कांदा शिल्लक असून, शेतकरी तो बाजारात आणत आहेत. काही शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे. देशभरातून मागणी वाढली असून, लाल कांदा विक्रीसाठी येण्याला अवधी असल्याने भावातील तेजी कायम राहू शकते. येत्या १५-२० नोव्हेंबरपर्यंत उन्हाळी कांदा आवक राहील. त्यानंतरसुद्धा भाव टिकून राहण्याची चिन्हे आहेत.
-सुशील व सारंग घोलप, कांदा व्यापारी,  जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT