Leopard Sakal
पुणे

Junnar Leopard Video: जुन्नर तालुक्यात शेतातील घराजवळच बिबट्याचा मुक्त संचार

Leopard Viral Video: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेतातील घराजवळ आढळला बिबट्या

दत्ता लवांडे

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे. एका घराच्या जवळच असलेल्या शेतात हा बिबट्या आढळला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा मुक्त संचार कॅमेरात कैद झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील ओतुर परिसरात पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भानुविलास गाढवे यांचे घर आहे. त्यांच्या घराजवळ रात्रीच्या जवळपास ९ ते साडेनऊच्या दरम्यान हा बिबट्या आढळला. त्यांच्या मुलाने गाडीतून हा व्हिडिओ शूट केला आहे. बिबिट्याचा वावर आढळल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?

चारचाकी गाडीच्या उजेडात हा बिबट्या शेतरस्त्यावरून समोरून येताना दिसत आहे. तर बिबट्याला पाहून गाडीतील महिलामध्ये सुद्धा घबराट निर्माण झाली आहे. गाडीतील महिला घाबरून "अहो आबाच्या उसापाशी लई मोठा वाघ आहे" असं फोनवर कुणाला तरी सांगत आहे. बिबट्या गाडीच्या उजेडातून शेतात निघून गेल्याचं पुढे दिसत आहे.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर

जुन्नर तालुक्यात उस आणि इतर पिकांची शेती चांगल्या प्रकारे केली जाते. तर जवळच भीमाशंकर अभयारण्य असल्यामुळे या परिसरात बिबट्यांचा वावर आढळून येतो. तर याआधीही अनेकदा बिबट्याचा वावर या परिसरात आढळून आला आहे. बिबट्याने घरामध्ये येऊन कुत्र्यावर हल्ला केल्याचेही प्रकार समोर आले होते. त्यामुळे या परिसरात वनविभागाकडून काळजी घेण्याचे अवाहन करण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT