Junnar water supply has been shut from three days
Junnar water supply has been shut from three days 
पुणे

जुन्नरमध्ये 25 हजार लोकसंख्या पाण्यापासून वंचित

दत्ता म्हसकर

जुन्नर : पाटबंधारे विभागाचे कुकडी नदीपात्रातील जुन्नर पालिकेच्या बंधाऱ्यात पाणी न सोडल्याने गेले तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला यामुळे नागरिकांना लागोपाठ दुसऱ्यांदा तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले आहे.

माणिकडोह धरणात जुन्नर शहरासाठी पिण्याचा पाणीसाठा राखीव असताना पाणी सोडण्यात पाटबंधारे विभागाचे अधिकारी चालढकल करतात. याबाबत तहसीलदार देखील सहकार्याची भूमिका घेत नाहीत. बंधाऱ्यातील पाणी संपण्याच्या अगोदर पत्र देऊनही दप्तर दिरंगाईमुळे नागरिकांना तीन-तीन दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास होतो तर लोकक्षोभाला
नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याने सत्ताधारी गटाचे शिवसेनेचे गटनेते दीपेश परदेशी, नगरसेवक अविन फुलपगार, समीर भगत, अंकिता गोसावी, सुवर्णा बनकर, वैभव मलठनकर यांनी बुधवार ता.13 पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. लोकप्रतिनिधीनी या प्रश्नात लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे.

सद्या पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. यामुळे पाणी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे तर नागरिकांना मात्र वार्षिक पाणीपट्टी भरूनही विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

जुन्नर शहरासाठी माणिकडोह धरणात पाणीसाठा राखून ठेवण्यात येतो. कुकडी नदीपात्रातील बंधाऱ्यातून शहरास पाणी उपलब्ध होते. यावर्षी धरणातून साठ दिवसांचे मोठे आवर्तन सुरू होते. ते बंद झाल्यानंतर बंधाऱ्यातील पाणीसाठा संपण्यापूर्वी कुकडी पाटबंधारे विभागास नगर पालिका लेखी पत्र देऊन पाणी सोडण्याची मागणी करते मात्र या पत्राकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने गेल्या काही दिवसांत नागरिकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करणे पालिकेला शक्य झाले नाही व नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागले असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

पालिका प्रशासनाने कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना बंधाऱ्यात दोन दिवस पुरेल इतका पाणी साठा असताना पाणी सोडण्याची मागणी केली असताना  त्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने तीन दिवस पाणी पुरवठा करणे शक्य झाले नाही असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

नगर पालिकेने मागणी केल्यानंतर बारा तासाच्या आत पाणी सोडावे.यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. करारानुसार देण्यात आलेल्या पाण्याचे मोजमाप हे नगर पालिकेने वापरलेल्या पाण्यानुसार करावे. बंधारा हद्दीत पाण्याचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई करावी.पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी अडचणी निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या उपोषण कर्त्यांच्या मागण्या आहेत.

नगर पालिकेने स्वतःचे पाणीसाठवण तलाव करण्याची आवश्यकता आहे तसेच धरणातून बंद जलवाहिनीतून पाणीपुरवठा करणेसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. फो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT