पुणे

जुन्नरच्या नगराध्यक्षांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी

CD

जुन्नर, ता. १२ : जुन्नर शहरातील पावसाळ्यापूर्वी सांडपाणी व्यवस्थापनाची तसेच नालेसफाईच्या कामकाजाची पाहणी नगराध्यक्षा सुजाता काजळे यांनी केली.
ऐन पावसाळ्यात नागरिकांना शहरातील नाल्यांमधून वाहणारे पावसाचे पाणी व सांडपाणी याचा नाहक त्रास सहन करावा लागू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना काजळे यांनी यावेळी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिल्या.
दरवर्षी जुन्नर शहर व परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. शहरातील नाल्यांमधून हे पावसाचे पाणी कुकडी नदीच्या प्रवाहाला मिळते. मात्र बहुतांश वेळा नगरपरिषद प्रशासनाकडून वेळेवर नालेसफाई न केल्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमधून न वाहता रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसून येते तसेच नालेसफाई वेळेवर न केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. याची दखल घेत काजळे यांनी शहरातील नाल्यांची तसेच सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी केली. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत याची दक्षता घेण्याची सूचना काजळे यांनी प्रशासनाला केली. दरम्यान, कामकाजात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT