पुणे

गोळेगाव परिसरात शेतमालाची वाताहात

CD

जुन्नर, ता. २२ : गोळेगाव परिसरात सोमवारी (ता.२२) दुपारी दीडच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्याचा फटका पिकांना बसला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तडाख्यात अंदाजे ६० शेतकऱ्यांचे अंदाजे ३५ हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जुन्नर तालुक्यातील अलदरे, गोळेगाव, लेण्याद्री नगर, कुमशेत फाटा या परिसरात जवळपास एक तास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची व शेतमालाची अक्षरशः वाताहात झाली. या परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी बाधितांकडून केली जात आहे.
अलदरे, गोळेगाव, लेण्याद्री नगर, कुमशेत फाटा येथे झालेल्या पावसाने शेवंती, टोमॅटो, ऊस, धणे, तरकारी पिकांचे नुकसान झाले. सध्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असतानाच या ढगफुटीने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरले. यासोबतच ढगफुटीमुळे शेताचे बांध फुटल्याने मोठ्या प्रमाणावर माती वाहून गेल्याचे प्रकार घडले आहेत. कुमशेत फाटा येथील शेतकरी हरिभाऊ काळे यांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य, किराणा माल, कॅरेट, मूरघास याचे नुकसान झाले तर येथीलच अंगणवाडीत पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
ढगफुटीसदृश पावसाची माहिती मिळताच तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दीपक मडके, नवनाथ पानसरे व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरात भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
या परिसरात एका दिवसात ६५ मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असल्यास तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले जातील, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.

03570

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Inflation Impact: मॉन्सूनची मंद वाटचाल! महागाईचा मोठा फटका बसणार; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार? सामान्यांच्या बजेटवर संकट

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update: पुण्याला यलो अलर्ट, पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

SCROLL FOR NEXT