Usha-Dhore
Usha-Dhore 
पुणे

आवश्‍यक झाडेच तोडा - महापौर उषा ढोरे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘चिखलीतील नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या (डब्ल्यूटीपी) जागेतील झाडांची पूर्वतपासणी आणि मोजणी करून त्यातील काही झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा. जी झाडे काढण्याची आवश्‍यकता आहे तेवढीच काढावीत व प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे,’’ अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी केल्या.

चिखलीतील शंभर एमएलडीचा नियोजित जलशुद्धीकरण प्रकल्प वेळेत मार्गी लागण्याच्या दृष्टीने महापौर ढोरे, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-ठेकेदार यांच्यासमवेत केंद्राच्या जागेची पाहणी केली. सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत आदी उपस्थित होते. या प्रकल्पाच्या ठिकाणी अंदाजे १५२७ झाडे आहेत. ही झाडे काढण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

डब्ल्यूटीपी बांधण्याच्या कामाची मुदत २४ महिने आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाने हे काम १२ ते १४ महिन्यांतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. या कामासाठी बुधवारी (ता. ४), गुरुवारी, शुक्रवारी या तीन दिवसांत डब्ल्यूटीपीच्या प्रत्यक्ष खोदाईच्या जागेतील वृक्ष काढून त्यांचे अन्य ठिकाणी पुनर्रोपण करणे व जी झाडे पुनर्रोपण करणे शक्‍य नाहीत, ती काढून टाकण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचेही आदेश ढोरे यांनी दिले. 

या तीन दिवसांतील कामाची पाहणी करण्यासाठी सर्व पदाधिकारी पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहेत. शनिवारपासून त्या ठिकाणी काम चालू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने आवश्‍यक ती यंत्रणा आणावी, अशाही पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. शहरासाठी आंद्रा आणि भामा-आसखेड धरणामधून पाणी उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भामा धरणामधून १६७ एमएलडी तर आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी पालिकेला मिळाली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात चिखलीत हा डब्ल्यूटीपी बांधण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT