thief.jpg
thief.jpg 
पुणे

पीएमपीएल प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील दागिने चोरट्यांनी लंपास केले

सकाळवृत्तसेवा

पुणे : नातेवाईकांसमवेत पीएमपीएल प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील एक लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी डांगे चौक ते बेलबाग चौकादरम्यानच्या प्रवासात घडला. 

याप्रकरणी दुंडप्पा चौगुले (वय 63, रा. डांगे चौक) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मेव्हणी असे दोघेजण डांगे चौक ते बेलबाग चौकादरम्यान पीएमपी बसमधून प्रवास करत होते. फिर्यादी यांच्या मेव्हणीने त्यांचे दागिने त्यांच्याकडील पर्समध्ये ठेवले होते. प्रवास करत असतानाच त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसुत्र, बांगड्या असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ते बसमधून उतरत असताना पर्समधील दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यानुसार त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT