पुणे : के के ट्रॅव्हल्स आणि के के ऍग्रो टुरिझम चे संचालक केदार श्रीकृष्ण कासार (वय 56) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुणे- मुंबई मार्गावर के. के. ट्रॅव्हल्स प्रख्यात आहे. केदार यांच्या मागे पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
पुण्यातून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जायचं आहे, प्रवाशांच्या तोंडावर लगेच के. के. ट्रॅव्हल्सचे नाव येते. देशातीलच नव्हे तर परदेशातीलही अनेक भारतीयांच्या मोबाईलमध्ये के. के. ट्रॅव्हल्सचा नंबर सेव्ह आहे. पुणे - मुंबई मार्गावर के. के. च्या 500 पेक्षा जास्त गाड्या रोज धावत होत्या. पण कोरोना आला आणि सगळंच विस्कळीत झालं
एका गॅरेजमधून करिअरची सुरुवात करणारे केदार कासार यांनी सातत्याने केलेल्या कष्टाच्या बळावर के. के. ट्रॅव्हल्स हा ब्रँड झाला. ज्या काळात पुण्यातून मुंबईतील विमानतळावर कसे पोचायचे, हा प्रश्न होता तेव्हा प्रवाशांना घरातून थेट विमानतळावर पोचवण्याचा व्यवसाय केदार यांनी सुरू केला. नवी कल्पना असल्याने प्रवाशांना ती भावली. एकटा प्रवासी असला तरी 'शेअरिंग कार' मधून तो घरी पोचत. परदेशातून आलेले अनेक पुणेकर आणि नाशिककर घरच्यांना सांगत की तुम्ही घ्यायला विमानतळावर येऊ नका, के. के. आहे, त्यातून घरी येतो. के. के. ट्रॅव्हल्सची पुणे, मुंबई आणि नाशिककमध्ये कार्यालये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.