पुणे

कडेपठार डोंगरात देशी वृक्षांची लागवड

CD

जेजुरी, ता. २३ : श्री क्षेत्र जेजुरी (ता. पुरंदर) येथील खंडोबाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठार डोंगरात वन विभाग आणि लिंगदेवता कडेपठार ट्रस्टतर्फे एक हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘हरित कडेपठार’ उपक्रमांतर्गत पुणे व जेजुरीतील १५ संस्थांनी यात सहभाग नोंदवला.
यावेळी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, जिल्हा परिषद सदस्या रूपाली झेंडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, रघुनाथ ढोले, म्हाळसाकांत जेजुरीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कडेपठार परिसरातील वनराई वाढवण्यासाठी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पोपटराव पवार यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत या उपक्रमाचे कौतुक केले. कडेपठार पायरी मार्गाच्या दुतर्फा ही लागवड करण्यात आल्याने भविष्यात भाविकांना सावलीचा लाभ मिळणार आहे. जिजामाता हायस्कूल व पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. ॲड. मंगेश जेजुरीकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

SCROLL FOR NEXT