In Kadmakavasti 6 members of the same family are infected with corona
In Kadmakavasti 6 members of the same family are infected with corona 
पुणे

पुण्यातील 'या' भागातील एकाच कुटुंबातील 6 सदस्य कोरोनाबाधित

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरात एकाच कुटुबांतील ६ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे रविवारी (ता. १२) आढळून आले आहे. दरम्यान,  अॅक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ वर पोहचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

घोरपडे वस्ती परिसरात एकाच कुटुबांतील ६ सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याच्या वृत्तास लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे, आरोग्य अधिकारी डी. जे. जाधव यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोरोनाबाधित कुटुंबातील काही सदस्य मागील तीन दिवसात अनेकांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले असून संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा केली जात असल्याची माहिती डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.  

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाबासाहेब काळभोर व ग्रामपंचायत प्रशासनाने मागील 10 दिवसांपासून कठोर उपाय योजना राबविल्या असल्या तरी, नागरीक प्रशासनाला पुरेसी साथ देत नसल्याने अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिक जागे झाल्याशिवाय कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतून कोरोना हटणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देतांना आरोग्य अधिकारी डी. जे. जाधव म्हणाले, ''घोरपडेवस्ती परिसरातील एका कुटुबांतील सदस्याला सर्दी व खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णांच्या स्वॅबची तपासणी लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली होती. रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्याने कुंटुबातील पाचही सदस्यांचे स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्टही पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले.''


नागरीकांनो आता तरी शहाणे व्हा, बेजबाबदारपणे वागू नका : सरपंच गौरी गायकवाड 
''
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, ''कोरोनाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह पुर्व हवेलीत धुडगुस घातला आहे. प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे, मात्र नागरीक बेजबाबदारपणे वागत आहे. मांजरी बुद्रुक, उरुळी कांचन येथील वाढत्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येपासून धडा घेण्याची गरज आहे. यामुळे नागरिकांनो आता तरी शहाणे व्हा, बेजबाबदारपणे वागू नका आणि घरात बसून सरकारला सहकार्य करा''

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 

Edited By: Sharayu Kakade

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT