Kalyani Nagar Accident  sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : अल्पवयीनाला कोठडीत ठेवणे कैद नाही का?;पोर्श अपघातप्रकरणी पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

पुण्यातील पोर्श अपघातप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. या अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीला कोणत्या कायद्यांतर्गत जामीन देण्यात आला, तसेच त्याला पुन्हा कैद कसे केले, असे सवाल न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने पोलिसांना केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पुण्यातील पोर्श अपघातप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. या अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीला कोणत्या कायद्यांतर्गत जामीन देण्यात आला, तसेच त्याला पुन्हा कैद कसे केले, असे सवाल न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने पोलिसांना केले. अपघात दुर्दैवी होता त्यात दोघांचा बळी गेला; मात्र अल्पवयीन मुलावरही त्याचा आघात झाला आहे, असे सुनावत न्यायालयाने २५ जून रोजी याबाबतचा निकाल जाहीर करण्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईला आव्हान देत आरोपी अल्पवयीन मुलाची आत्या पूजा जैन हिने ॲड. स्वप्नील अंबुरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

याचिकाकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, मुलाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले आहे. मुलाला जामीन मिळाल्यावर आणि जामीन आदेश लागू असताना त्याला ताब्यात घेतले जाऊ शकते का, असा सवाल ॲड. पोंडा यांनी केला. सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले की, आमच्याकडे आजपर्यंत कुणीही मुलाचा ताबा मागण्यासाठी आलेले नाही. रक्ताचे सगळेच नातेवाईक कोठडीत आहेत.

न्यायालय काय म्हणाले?

  • अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी अर्ज का दाखल केला नाही?

  • जामिनानंतर मुलाला पुन्हा कैद करण्याचे कारण काय?

  • अल्पवयीन मुलाला निरीक्षणगृहात बंदिस्त करण्यात आले आहे.

  • हा बंदिवास नाही का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT