porsche motors pune accident esakal
पुणे

Porsche Car Accident : ‘त्या’ला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; बाल न्याय मंडळाचा आदेश

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मोटारचालक मुलाला १९ मे ला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते.

सनिल गाडेकर

पुणे - पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी पोर्श मोटार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाची व्यसनाधीनता थांबावी म्हणून येथील बाल न्याय मंडळाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचा आदेश दिला आहे. मुलाला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्यात यावे, असे मंडळाच्या आदेशात नमूद आहे.

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मोटारचालक मुलाला १९ मे ला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. मुलावर दाखल असलेला गुन्हा जामीनपात्र असून मुलगा अल्पवयीन असल्याचे त्याच्या वकिलांनी मंडळाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मंडळाने त्वरित मुलाला जामीन मंजूर केला होता.

मात्र त्यात असलेल्या अटींमुळे या निकालावर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे मंडळाने आपल्या आदेशात दुरुस्ती करून मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्याची विनंती पोलिसांनी केली होती. त्यानुसार मुलाला पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला आहे.

हा आदेश देताना मंडळाने त्यात मुलाचा ताबा कोणाकडे असेल, त्याला पालकांना भेटण्याची परवानगी, त्याची मुक्तांगणमध्ये रवानगी यासह विविध मुद्यांवर आदेश दिला आहे. दरम्यान, पाच जूनला मुलाची मंडळातून सुटका झाल्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे. मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले आहे. मात्र अद्याप ही नावे मंडळात सादर करण्यात आलेली नाहीत.

आठवड्यातून दोनदा भेटण्याची परवानगी

मुलाचे कुटुंबीय त्याला आठवड्यातून दोन वेळा सकाळी ११ ते १२ दरम्यान भेटू शकता, असे आदेशात नमूद आहे. मुलाला भेटण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी मंडळाकडे केली आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

मुक्तांगणमध्ये कधी पाठवायचे याबाबत अद्याप स्पष्टता नाही

मुलाला नेमके किती दिवस आणि कधी मुक्तांगणमध्ये पाठवायचे आहे, याबाबतची माहिती ‘सकाळ’कडून घेण्यात आली. मात्र त्यात अद्याप स्पष्टता आलेली नाही. कोणतेही अल्पवयीन बालक जेव्हा मंडळात दाखल होते. तेव्हा त्याच्या सुधारणेसाठी काय-काय करण्यात आले, याचा एक अहवाल त्याची सुटका करताना तेथील पर्यवेक्षक सादर करत असतात. त्यामुळे मुलाच्या सुधारणेसाठी नेमके काय करण्यात आले, याचा उलगडा त्या अहवालानंतरच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT