kanade1.jpg
kanade1.jpg 
पुणे

गृहमंत्र्यांनी केले कोरोना वाॅरिअर्सचे कौतुक

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : कळंब (ता. आंबेगाव) येथील देवदत्त प्रभाकर कानडे मुंबई येथे पोलिस दलात काम करतात तर त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे केईएम रुग्णालयात गेले दोन महिन्यापासून मुंबई येथे कोरोना विरुद्ध कर्तव्य आपल्या लहान मुलाला घरी ठेवून पार पाडत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक ट्विटर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे केले आहे. 

पोलिस देवदत्त कानडे हे गेले दोन महिन्यापासून आपल्या जिवावर उदार होऊन दिवस रात्र सेवा देत आहे. त्यांच्या पत्नी सुवर्णा भगत- कानडे 2 फेब्रुवारी 2009 पासून केईएम रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. कोविड-19 तसेच नॉन कोविड- 19 या रुग्णांच्या रक्त तपासणी करण्याच्या लॅबमध्ये दिवसाला पाच ते सहा हजार रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करत आहेत. हे "कोरोना वॉरिअर्स' कानडे दांपत्य आपल्या लहान मुलाला घरी एकटं ठेवून कोविड- 19 च्या लढ्यात आपलं कर्तव्य बजावत आहेत. स्वतःचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांचा विचार न करता कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वत:ला वाहून घेतलं आहे. आपल्या सुट्ट्या रद्द करून हे कर्मचारी कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. 

पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून दूर राहून आपलं काम करावं लागत आहे. घरी जाण्यासाठी वेळ मिळाला तरी, घरच्यांना स्वत:पासून दूरच ठेवावं लागत आहे. असाच एक भावनिक फोटो गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ट्‌विटर अकाऊंटवरुन पोलिस नाईक या पदावर काम करणारे देवदत्त कानडे आणि केईएम रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुवर्णा कानडे या पती-पत्नीचा फोटो शेअर करून कोरोना वॉरिअर्स म्हणून कौतुक केलंय. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोविड-19 च्या लढाईत वातावरण तणावविरहीत ठेवून आम्ही सर्वजण काम करत आहोत. सरकारच्या प्रयत्नांना जनतेने साथ देऊन आपण कोरोना विरुद्धची लढाई नक्की जिंकणारच आहे आणि कोरोनाला हरवणार आहे. महाराष्ट्रातील जनता प्रशासनास योग्य सहकार्य देत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की कोरोनाच्या संकटावर आपण नक्कीच मात करणार आहे, असे पोलिस नाईक देवदत्त कानडे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुवर्णा कानडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT