पुणे

कान्हवडीत बिबट्यांकडून दोन बकऱ्यांचा फडशा

CD

उत्रौली, ता. ८ : कान्हवडी (ता. खंडाळा) येथील नारायण काशिनाथ मरगजे यांच्या दोन बकऱ्यांचा तीन बिबट्यांनी फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
नारायण मरगजे डोंगराशेजारील रानात दोन बकऱ्या चारत असताना तीन बिबट्यांनी बकऱ्यांवर हल्ला केला. त्यांनी दोन बकऱ्या ओढत जंगलात नेल्या व फस्त केल्या. बकऱ्यांचा मरगजे आणि ग्रामस्थांनी शोध घेतला. त्यावेळी त्यातील एक बकरी अर्धवट अवस्थेत खाल्लेली निदर्शनास आली. साधारणतः ५० हजार किमतीच्या बकऱ्या मारल्या गेल्याने मरगजे यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, वनखात्यामार्फत पंचनामा करण्यात आला. गेल्या दोन महिन्यांत सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्रौली, खानापूर, वडगाव डाळ या परिसरात २०पेक्षा जास्त पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मारली गेली असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT