पुणे

नवनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेश फडतरे

CD

गराडे, ता. ११ : बोपगाव (ता. पुरंदर) येथील जागृत देवस्थान श्री कानिफनाथ गडावरील श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुरेश फडतरे यांची निवड झाली आहे. तर सचिवपदी महादेव फडतरे यांची आणि खजिनदारपदी सोनबा फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे या निवडी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत करण्यात आल्या. सदर विश्वस्त मंडळाची पदाधिकारी कार्यकारिणी मुदत ही तीन वर्षासाठी आहे.
विश्वस्त मंडळ पदाधिकारी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष : सुरेश फडतरे, उपाध्यक्ष : दीपक फडतरे, सचिव : महादेव फडतरे, खजिनदार : सोनबा फडतरे, विश्वस्त : ज्ञानोबा फडतरे, जयवंत फडतरे, नागेश फडतरे, शिवाजी जगदाळे, प्रकाश (भाऊ) फडतरे, प्रकाश (आप्पा) फडतरे, नितीन फडतरे, मंगेश फडतरे, रमेश फडतरे.
श्री क्षेत्र कानिफनाथ गड हे संपूर्ण महाराष्ट्रभर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. भाविकांच्या सोई सुविधेसाठी व देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे नूतन अध्यक्ष सुरेश फडतरे, सचिव महादेव फडतरे व खजिनदार सोनबा फडतरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT