पुणे

करंजे पेठेत पाण्‍यासाठी रास्‍तारोको

CD

करंजे पेठेत पाण्‍यासाठी रास्‍ता रोको
सातारा, ता. ९ : अपुऱ्या पाणीपुरवठ्यास कंटाळलेल्‍या करंजे पेठेतील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी मुख्‍य रस्‍त्‍यावर पाण्‍याची रिकामी भांडी ठेवत रास्‍ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे येथील मुख्‍य मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
करंजे पेठेतील काही भागांत काही दिवसांपासून अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत होता. पाणीपुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्‍यात सुधारणा होत नसल्‍याने नागरिकांत रोष होता. त्‍यातच गेल्‍या चार दिवसांपासून अत्‍यंत कमी दाबाने पाणी येत असल्‍याने नागरिकांची पाण्‍यासाठी मोठी तारांबळ उडाली होती. त्‍यामुळे संतापलेल्‍या नागरिकांनी करंजे येथील महालक्ष्‍मी मंदिराच्‍या वळणावर शुक्रवारी सकाळी अचानक रास्‍ता रोको केला. पाण्‍याची रिकामी भांडी रस्‍त्‍यावर ठेवत नागरिकांनी संपूर्ण मार्ग रोखून धरला. यामुळे बसस्‍थानकाकडून मोळाच्‍या ओढ्याकडे जाणारी आणि त्‍याठिकाणाहून येणारी वाहतूक पूर्णपणे थांबली. आंदोलनाची माहिती मिळाल्‍यानंतर शहर वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले. यादरम्‍यान पालिकेच्‍या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे हे देखील त्‍याठिकाणी दाखल झाले. त्‍यांनी नागरिकांचे मत ऐकून घेत पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या उपाययोजना तातडीने राबवण्‍याच्‍या सूचना कर्मचाऱ्यांना केल्‍या.
............................
फोटो :...... 56494
सातारा : करंजे पेठेतील नागरिकांनी रोखलेला रस्‍ता. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

Maharashtra Live News : बारामतीत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यासह सर्व बंडखोरांची हकालपट्टी

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

Kannad News : जामडी (घाट) येथे 19 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन संपविले जीवन; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT