मोरगाव, ता. २२ : बारामतीच्या जिरायती पट्ट्यात शेतीसाठी पाण्याची कायम स्वरूपी सोय होण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी जोड प्रकल्प महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कऱ्हा नदी जोड प्रकल्पासाठी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मोरगाव वडगाव निंबाळकर गटाच्या नवनिर्वाचित सदस्य रोहिणी संदीप कदम (ढोले) यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गेली अनेक वर्षांपासून बारामतीच्या जिरायती भागात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे. शाश्वत पाण्याअभावी या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नाचे गणित सतत कोलमडते.
वडगाव निंबाळकर गटातील मूर्टी, मोढवे, मोराळवाडी, जोगवडी, मोरगाव, पळशी, मासाळवाडी, तरडोली, लोणीभापकर गावे जिरायती आहेत.सतत दुष्काळाला सामोरे जावे लागते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प वेगाने होईलच हा शब्द मतदारांना दिला होता.
नीरा कऱ्हा जोडप्रकल्पासाठी लागणारी १०२४ कोटींची तरतूद करावी व वेगाने या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यास बारामतीच्या जिरायती भागाला मदत करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.