पुणे

कऱ्हाडच्या विकासाला महायुती सरकारमुळे गती

CD

महायुती सरकारमुळे कऱ्हाडच्या विकासाला गती

पालकमंत्री शंभूराज देसाई; एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून कामांना मान्यता

कऱ्हाड, ता. २ ः शहराचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून दिसतो आहे. मोठ्या योजनांना जास्तीतजास्त निधी मिळवून देण्यासाठी राजेंद्रसिंह यादव यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासकामांना मान्यता मिळत आहे. त्यामुळे विकासाला अधिक गती मिळाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत शनिवार पेठेतील ड्रेनेज पंपिंग स्टेशन क्रमांक एकचे भूमिपूजन आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘कागदोपत्री प्रस्ताव पाठवून किंवा योजना मंजूर होत नाही, असे म्हणणे सोपे असते. मात्र, तो प्रस्ताव शासनाकडून प्रत्यक्षात मंजूर करून कसा आणायचा? त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि विशेष कौशल्य लागते. नगराध्यक्ष यादव यांच्याकडे ती खास बाब आहे. मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्यात त्यांची हातोटी कौतुकास्पद आहे.’’
माजी मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘वाढत्या सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी ९६ कोटींची सुधारित योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’’
फारूक पटवेकर यांनी प्रास्ताविक केले. अख्तर आंबेकरी यांनी आभार मानले.
--------------------
चौकट

‘त्या’ रीलची दखल घेऊ

कार्यक्रमानंतर पत्रकारांनी श्री. देसाई यांना पुणे-बंगळूर महामार्गावर येथे झालेल्या नव्या उड्डाणपुलावर एका महिला पोलिसाने वाढदिवस साजरा केला. त्याची रील समाज माध्यमावर प्रसारित केली आहे, त्याबद्दल काही माहिती आहे का? असे विचारले. त्यावेळी श्री. देसाई यांनी त्याबद्दल मला काही माहिती नाही. तुम्हाला नाव माहीत आहे का, असेल तर सांगा, असे विचारत त्याबद्दल पोलिस उपअधीक्षकांना माहिती विचारतो. तशी रील झाली असेल, तर त्याची निश्चित दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------------------
63730
कऱ्हाड ः शहरातील भुयारी गटार योजनेंतर्गत ड्रेनेज पंपिंग स्टेशनचे भूमिपूजन करताना शंभूराज देसाई. समवेत बाळासाहेब पाटील, राजेंद्रसिंह यादव व नगरसेवक.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुण्यात परतीच्या पावसाची पाठ; ऑक्टोबरमध्ये अवघा १.७ मिमी पाऊस, ११ वर्षांतील नीचांकी नोंद

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानने घडवला इतिहास! फक्त श्रीलंका, विंडीजलाच नाही, तर इंग्लंडलाही टाकलं मागे

Latest Marathi News Live Update : 'संविधानाला धक्का लागू देणार नाही!' फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Dates & Coconut Ladoo: यंदाच्या दिवाळीत फराळात बनवा हटके पदार्थ! साखरेशिवाय तयार करा खजूर-नारळाचे पौष्टिक लाडू; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल!

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT