पुणे : ‘‘सामाजिक न्यायमंत्री पती धनंजय मुंडे यांच्यासोबत आपले भांडण वेगळे आहे, अभी पिक्चर बाकी है. मी बऱ्याच यातना सहन केल्या असून, मला अद्याप न्याय मिळालेला नाही. जेव्हा माझे पती मला म्हणतील की मी हरलो तू जिंकली, तो माझ्यासाठी न्याय असेल,’’ असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केले. (Dhananjay Mundhe And Karuna Mundhe)
करुणा मुंडे यांनी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना केली आहे. त्यांनी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी श्रमिक पत्रकार संघामध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conference) त्या बोलत होत्या. ‘रयत महाराष्ट्र’ संघटनेचे प्रदेश प्रभारी रुषिकेश गायकवाड, गणेश भालेराव आदी या वेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, महिलांना आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठी आपण पक्ष स्थापन केला आहे. त्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी नगर येथे ३० जानेवारीला किमान एक लाख लोकांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे परवानगी मिळाली तरच हा मेळावा घेण्यात येईल.
‘‘न्यायालयाच्या आदेशामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात काही बोलणार नाही. न्यायालयाची स्थगिती उठेल त्यादिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेउन आपल्यावरील अन्याय जनतेला सांगू. महिलांवरील अन्यायाबाबत कोणीही आवाज उठवत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले नेते आहेत, परंतु त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. तरच, शक्ती कायदा अस्तित्वात आला असे आपण समजू,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.
परळीत नवराविरुद्ध बायको अशी लढत
सच्चा राजकारणी तोच होतो जो एक सच्चा कार्यकर्ता असतो. माझ्या मुलाला राजकारणात यावे वाटल्यास त्याला अगोदर कार्यकर्ता होण्यास सांगू. मला सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे न्यायचे आहे. गरज पडल्यास परळी वैजनाक्षमधून नवराविरुद्ध बायको अशी लढत होणार, असे सांगत आगामी विधानसभा निवडणूक धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ‘‘महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर जे ट्विट करतात ती स्टंटबाजी आहे. त्यांनी तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून दाखवावा,’’ असे आव्हान मुंडे यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.