वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Admission
AdmissionSakal

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांतर्गत वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (CET Medical Admission Process Updates)

त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपर्यंत (ता.१७) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. या अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर होणार होती. परंतु विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ दिल्याने अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

Admission
अखेर नितेश राणे प्रकटले! थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत लावली हजेरी

या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित सविस्तर वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ‘www.mahacet.org’ या संकेतस्थळावर ‘नीट-युजी’ येथे उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती ‘सीईटी सेल’तर्फे देण्यात आली आहे.

या प्रवेश प्रक्रियेतंर्गत सर्व आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची सर्वसाधारण यादी आणि फेज-१, फेज-२, फेज-३ आणि कॅप फेरी अंतर्गत तात्पुरती गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि नोंदणी शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Admission
NCPचे सिद्धार्थ कांबळे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष; तर उपाध्यक्षपद भाजपकडे

आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांची यादी :

- एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी ॲण्ड ओ आणि बी.एस्सी नर्सिंग अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक : तपशील : कालावधी

  • - ऑनलाइन नोंदणी अर्ज करणे : १७ जानेवारी

  • - नोंदणी शुल्क भरणे, त्यासाठी ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करणे : १७ जानेवारी

  • - प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे : १७ जानेवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com