Metro
Metro 
पुणे

‘कर्वे रस्त्यावरील मेट्रोचे काम आठ महिन्यांत पूर्ण होणार’

सकाळवृत्तसेवा

कोथरूड - कर्वे रस्त्यावरील मेट्रोचे काम अजून किमान ८ महिने चालणार असून, या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामेट्रो प्रयत्नशील असल्याचे मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी व अन्य समस्यांवर मार्ग काढण्यासाठी भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सर्व संबंधित घटकांची बैठक आयोजित केली होती. या वेळी गाडगीळ बोलत होते. या वेळी  सहप्रकल्प संचालक प्रशांत कुलकर्णी, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) वाकुडे, दिलीप वेडे-पाटील, दीपक पोटे, जयंत भावे, राजा बराटे, मंजूश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, महेश पोटे, अजय मारणे, नवनाथ जाधव, दीपक आव्हाड, दत्तात्रय आठवले, रूपाली मगर, मेघना काळे आदी उपस्थित होते. या वेळी दीपक पोटे व राजा बराटे यांनी रस्ता बंद करणे, वाहतूक वळविणे यांसह कोणतेही निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना कळविले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जयंत भावे यांनी सायंकाळी ६ ते ९ या एकेरी वाहतुकीच्या वेळी लॉ कॉलेज रस्त्यावरून नळ स्टॉपमार्गे पौड रस्त्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांना थेट पौड फाटा पुलावर प्रवेश द्यावा, अशी मागणी केली. तसेच, कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होत असताना कर्वे पुतळ्याकडून पौड फाट्याकडे येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत असल्याकडे खर्डेकर यांनी लक्ष वेधले. ही सर्व कामे येत्या आठवडाभरात मार्गी लावू, तसेच १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान नदीपात्रातील रस्ता मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात येणार असल्याने हा बदल नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी सूचना फलक लावण्यात येणार असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT