No Parking sakal
पुणे

Pune Parking : कर्वे रस्त्यावर पार्किंगचे बोर्ड लावण्यास महापालिकेची टाळाटाळ

रस्त्यावर नेमके पार्किंग कुठे करायचे हे नागरिकांना समजण्यासाठी पार्किंगचे बोर्ड लावणे, रस्त्यावर पट्टे मारणेही आवश्‍यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कर्वे रस्त्यावर खंडूजीबाबा चौक ते हुतात्मा राजगुरू चौकापर्यंत (करिष्मा सोसायटी परिसर) असणारे नो पार्किंग रद्द करून जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. मात्र, या रस्त्यावर नेमके पार्किंग कुठे करायचे हे नागरिकांना समजण्यासाठी पार्किंगचे बोर्ड लावणे, रस्त्यावर पट्टे मारणेही आवश्‍यक आहे. परंतु हे काम अद्याप महापालिकेने केलेले नाही. पोलिसांकडून पत्र मिळाल्यावर ही कार्यवाही केली जाईल असे सांगून यास विलंब लावला जात आहे.

वनाज ते रामवाडी या दरम्यान मेट्रोचे काम सुरू झाल्याने व नळ स्टॉप येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे २०१८ पासून कर्वे रस्त्यावर खंडुजीबाबा चौक ते हुतात्मा राजगुरू चौकापर्यंत दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात आले होते. हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी पाच वर्ष गैरसोय सहन केली.

पार्किंग नसल्याने कर्वे रस्त्यावरील बाजारपेठेवर त्याचा विपरीत परिणाम झाला. मेट्रो व उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होऊन एक वर्ष उलटून गेला तरीही नो पार्किंग हटविण्यासंदर्भात निर्णय होत नव्हता. याविरोधात कर्वे रस्ता व्यापारी संघटनेसह, मनसे जनाधिकार सेनेने आक्रमक भूमिका घेतली. दैनिक ‘सकाळ’नेही हा प्रश्‍न उचलून धरून त्याचा पाठपुरावा सुरू केला.

अखेर १९ जून रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत बैठक आयोजित करून कर्वे रस्त्यावरील नो पार्किंग रद्द करा व व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेऊन कोणत्या ठिकाणी पार्किंग करायचे आहे हे निश्चित करावे असे आदेश दिले होते.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर या रस्त्यावर लावलेले नो पार्किंगचे बोर्ड त्वरित काढण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांच्या सूचनेनुसार चारचाकी, दुचाकी पार्किंगचे बोर्ड लावणे व पट्टे मारणे आवश्‍यक आहे. येथील नो पार्किंगचे बोर्ड काढून टाकल्यानंतर सध्या रस्त्यावर पार्किंग केले जात आहे.

पण रस्त्यावर पार्किंग आहे की नाही असा संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे कारवाईची धाकधूकही आहे. त्यासाठी महापालिकेने पोलिसांशी समन्वय साधून बोर्ड लावून घेणे व पट्टे मारणे आवश्‍यक आहे.

‘कर्वे रस्त्यावरील नो पार्किंगचे बोर्ड काढून टाकण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांकडून पार्किंग कुठे करायचे आहे याचे पत्र मिळाले की बोर्ड व पट्टे मारले जातील. ’

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

‘कर्वे रस्त्याच्या संदर्भात महापालिकेतच बैठक झाली होती. पार्किंग कुठे करायचे आहे याचे पत्र यापूर्वी महापालिकेला पत्र दिले आहे. आता पुन्हा एकदा पत्र दिले जाईल.’

- विजयकुमार मगर, उपायुक्त, वाहतूक पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT