Ravindra Dhangekar Girish Bapat
Ravindra Dhangekar Girish Bapat Sakal
पुणे

Kasaba ByPoll : रविंद्र धंगेकर गिरीश बापटांच्या भेटीला; लागेल ती मदत करण्याचं बापटांचं आश्वासन

सकाळ डिजिटल टीम

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान निवडून येताच धंगेकरांनी भाजपा खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीत काय झालं याबद्दल माध्यमांना सांगितलं. धंगेकर म्हणाले, "मी बापटांसोबत दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. पण कधी संघर्ष झाला नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली. पण सत्ताधारी पक्षाने यंदा खूप चुकीचं राजकारण केलं, पैशाचं राजकारण करत निवडणूक लढली. बापटांनी कधी पैसे वाटले नाही, सर्वसमावेशक प्रेमाने राजकारण केलं, त्यामुळेच जनतेने त्यांच्या पदरात मतं टाकली. "

"बापटांनी माझं अभिनंदन केलं. तू चांगली मेहनत घेतली, त्याचं फळ तुला मिळां असं मह्णाले. नियोजन कर आणि चांगल्या पद्धतीने कामाचा पाठपुरावा कर तुला निश्चित यश मिळेल. तुला अडचण आली, गरज वाटली तर तुला पूर्णपणे मदत करीन. वडीलकीच्या नात्याने त्यांनी सूचना केल्या तेव्हा मन भरून आलं की आपल्या पाठीशी अनेक लोक आहेत. पक्षविरहीत राजकारण करताना त्यांनी कधी माणसं संपवण्याचं कुरघोडीचं राजकारण केलं नाही. विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी ताकद दिल्याचं मी पाहिलं. म्हणून मी त्यांचे आशिर्वाद घेतले, त्यांच्या सूचना पाळेन", असंही रविंद्र धंगेकर पुढे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT