kasba Bypoll Election Ban on social media campaigning Delay in declaration election expenditure politics pune
kasba Bypoll Election Ban on social media campaigning Delay in declaration election expenditure politics pune sakal
पुणे

Kasba Bypoll Election : कसब्यात प्रचारावर किती खर्च झाला? निवडणूक खर्च जाहीर करण्यास विलंब

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला. परंतु कसबा मतदारसंघातील भाजप आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचारावर किती खर्च झाला, याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर केलेली नव्हती.

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या पुण्यात प्रचार सभा झाल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही या प्रचारामध्ये सहभाग नोंदवला. बैठका, सभा, रॅलीचे आयोजन करण्यात आले. परंतु या जाहीर कार्यक्रमांवर कोणत्या पक्षाने किती खर्च केला, याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा ४० लाखांपर्यंत केली आहे. प्रचारासाठी किती खर्च झाला, याची माहिती राजकीय पक्ष आणि उमेदवारांना दररोज सादर करावी लागते. चिंचवडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही खर्चाची माहिती वेळोवेळी जाहीर केली. परंतु कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून शेवटच्या दिवशी ही माहिती जाहीर करण्यात आली नाही.

उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची माहिती निवडणूक निरीक्षकांकडून शुक्रवारी सायंकाळी तपासण्यात आली आहे. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे उमेदवारांच्या खर्चाची माहिती शनिवारी जाहीर करण्यात येणार आहे.- स्नेहा किसवे-देवकाते, निवडणूक निर्णय अधिकारी

सोशल मीडियावरील प्रचाराला बंदी

निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारांना प्रलोभन दाखवणे किंवा मतदानासाठी आवाहन करता येणार नाही. सोशल मीडियावरूनही हा प्रचार करता येणार नाही. याबाबत तक्रार आल्यास शहानिशा करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी किसवे-देवकाते यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT