hemant rasane cm eknath shinde kasba bypoll election rally politics pune sakal
पुणे

Kasba Bypoll Election : कसब्याच्या मतदानावर मुख्यमंत्र्यांची नजर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोन करून कसब्यातील स्थिती काय आहे याची चौकशी

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आक्रमक प्रचार झालेला असताना मतदानाच्या दिवशीही वरिष्ठ नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट फोन करून कसब्यातील स्थिती काय आहे याची चौकशी केली. तर काँग्रेसच्या नेत्यांनीही दर तीन तासांनी आढावा घेतला.

आज मतदानाच्या दिवशीही माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली. ही निवडणूक घासून होणार असल्याने हक्काचे मतदार बाहेर काढावेत यासाठी यंत्रणा लागलेली असताना त्यानुसार काम होत आहे की नाही यावर भाजप व शिवसेनेचे नेते लक्ष ठेवून होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी धीरज घाटे यांना फोन करून प्रभागात काय स्थिती आहे, मतदान किती झाले आणखी किती अपेक्षीत आहे यासंदर्भात फोन केला. तर गणेश बीडकर यांनाही शिंदे व फडणवीस यांनी फोन केले.

त्याचप्रमाणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह इतर नेत्यांनीही कसब्यातील स्थिती जाणून घेण्यासाठी फोन केले.

कसब्याची जागा आपण जिंकू शकतो असा विश्‍वास काँग्रेस नेत्यांना असल्याने त्यांनीही आजच्या स्थितीकडे लक्ष ठेवून होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुनील केदारी यांच्यासह अनेक नेत्यांनी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी यांना व इतरांशी संपर्क साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra News: अवघ्या दोनशे रुपयांत होणार जमिनींचे पोटहिस्से, मोजणी फीमध्ये सवलत; राज्य भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याचं टोकाचं पाऊल, निवृत्तीला उरलेले फक्त दहा दिवस; काय घडलं?

Jalgaon News : प्रेमविवाहाचा राग, तरुणाला नग्नावस्थेत खांबाला बांधून मारहाण; ५ जणांना अटक

Maharashtra News: वीज चोरी; गुन्हा आणि जीवाला धोका; भारतीय विद्युत कायदा २००३ अंतर्गत कठोर शिक्षा

Latest Marathi News Live Update : वर्धा-नांदेड महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक

SCROLL FOR NEXT