Rupali Thombre Patil  
पुणे

Kasba Bypoll Election : 'ती मी नव्हेच' आरोपानंतर टिळकांच्या भाषेतच ठोंबरे पाटलांचे उत्तर

रूपाली पाटील-ठोंबरे नव्या वादात

सकाळ डिजिटल टीम

पुणे कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर मतदानाचा हक्क बजावतेचा फोटो शेअर केला. त्या पोस्टनंतर गोपिनियेतेचा भंग केला आहे. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांनी हे आरोप फेटाळून लावला आहे. मी शेंगा खाल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही. असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो फेसबुकवर शेअर केल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली. दरम्यान, त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले ठोंबरे पाटील?

मुळात मी फोटो टाकलेला नाही. त्यामुळे गोपिनियेतेचा भंग होत नाही. मला कसब्यातील मतदारांनी त्यांचा फोटो पाठवला होता. रविभाऊंनाच ताई मतदान आहे. तो फोटो मी माझ्या डीपीला आणि फेसबुकला पोस्ट केला आहे. त्यामुळे मी शेंगा खाल्या नाहीत. मी टरफले उचलणार नाही. आणि माझ्या एका फोटोचं अस काय भाजपला त्रास होऊ लागला? असा सवाल उपस्थित केला.

अन् तुम्ही या निवडणुकीत मतदारांना धमकावलं, गंज पेठेतील लोकांना मारहाण केली. या सर्वांवर आधी गुन्हा दाखल करा. मग माझ्यावर करा. मी कायदेशीर उत्तर द्यायला तयार आहे.

फोटोचं रहस्य काय आहे? जो मतदार आहे. त्याने हा मला फोटो पाठवला आहे. त्या फोटोमध्ये माझा हात नाही. त्या हातात चांदीचं कडं आहे. माझ्या हाताच तांब्याच कडं आहे. वाटलं तर सीआयडी लावा. नशीब या तपासासाठी ईडीला बोलावलं नाही म्हणजे धन्य झालं. भाजपवाले शब्दशः मेंटल झाले आहेत. सोशल मीडियावर काय टाकायचे काय नाही हा माझा अधिकार आहे आणि तो फोटो माझा नाही. असही ठोंबेर पाटील म्हणाल्या.

सत्ताधारांच डोकं फिरलं आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखलं करा. धंगेकर सातत्याने व्हीडओ शेअर करत आहेत. मात्र, पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. असा दावाही ठोंबरे पाटलांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT