पुणे

कातरखटाव च्या भूमि्पूत्रांचा गौरव प्रेरणादायी : तुषार दोषी

CD

कातरखटावच्या भुमिपुत्रांचा गौरव प्रेरणादायी

तुषार दोशी; कात्रेश्वर यात्रेच्‍या औचित्याने विविध क्षेत्रातील मान्‍यवरांचा गौरव

कातरखटाव, ता. २० : कातरखटाव येथील ग्रामदैवत श्री कात्रेश्वर यात्रेचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या भूमिपुत्रांचा केला जाणारा गौरव कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.
कातरखटाव (ता. खटाव) येथे कात्रेश्वर यात्रेनिमित्त आयोजित नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲड. दिलीप बोडके, पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पत्रकार राजेंद्र वाघमारे, सुजित आंबेकर, सरपंच निर्मला बागल, सोसायटीच्या उपाध्यक्षा लता बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. दोशी म्हणाले, ‘‘सुदृढ समाज निर्मितीसाठी अशा उपक्रमांची गरज असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या गावच्या मातीचे व समाजाचे ऋण फेडण्‍याचा प्रयत्न करावा.’’ या वेळी सुजित आंबेकर, राजेंद्र वाघमारे, ॲड. दिलीप बोडके यांची मनोगते झाली.
कार्यक्रमात उद्योजक दत्तात्रय महामुनी यांना कातरखटाव भूषण, उद्योजक अशोक बागल यांना कात्रेश्वर उद्योगरत्न व डॉ. नामदेव मोहिते यांना कातरखटाव सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कात्रेश्वर हायस्कूल व जिल्‍हा परिषद शाळेसाठी ग्रामस्थांनी आर्थिक मदत दिली. माजी सैनिक वसंत बागल यांना महाराष्ट्र शासनाचा क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास विशाल बागल, संजय बागल, जयकुमार बागल, मकरंद बोडके, धनाजी दुबळे, सुशील तरटे, अमोल चव्हाण, अमोल नलवडे, राजू पाटोळे, मृगेंद्र शिंदे, माणिकराव पाटील, दत्ता पाटोळे, प्रमोदसिंह फडतरे, अजय पाटील, लक्ष्मण शिंगाडे, पोपट बागल, बबन बागल, बाळासाहेब बागल, बाळासाहेब दुबळे, चंद्रकांत बागल, नानासाहेब शिंदे, नानासाहेब बोडके, अनिल कदम, सुमीत तरटे, दिलीप बागल, विजय बागल, अजित सिंहासने, आनंदराव बागल, महेश जरे, पांडुरंग बागल, भाऊसाहेब मोरे, योगेश जाधव आदींसह शिक्षक विचार मंचचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमोल बागल यांनी सन्मानपत्र वाचन केले. बलराज बागल यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र बागल यांनी आभार मानले.
......................................................
फोटो :...........00306
कातरखटाव : दत्तात्रय महामुनी यांना कातरखटाव भूषण या पुरस्‍काराने सन्‍मानित करताना तुषार दोशी. (धनंजय चिंचकर : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT