Pune News  sakal
पुणे

Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला येणार गती;१४० कोटींचा निधी पालिकेच्या खात्यात जमा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने १३९ कोटी ८३ लाख रुपये देण्याचा आदेश काढला होता. मात्र, हा निधी महापालिकेच्या खात्यात जमा होण्यास विलंब झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने १३९ कोटी ८३ लाख रुपये देण्याचा आदेश काढला होता. मात्र, हा निधी महापालिकेच्या खात्यात जमा होण्यास विलंब झाला होता. आता तो निधी जमा झाला असून, कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती येणार आहे. राज्य सरकारकडून महापालिकेच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यात आला असून, हा निधी प्रामुख्याने भूसंपादनासाठी वापरण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. यासाठी ‘सकाळ’ने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता. रस्त्याचे काम भूसंपादनामुळे रखडले होते. अनेक ठिकाणी आम्ही तडजोडीतून जागा ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, काही मिसिंग लिंकसाठी पैशांची गरज होती. आता पैसे जमा झाल्याने भूसंपादनाच्या कामाला गती देण्यात येईल. त्यानंतर रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे घेऊन जाता येईल.

- डॉ. राजेंद्र भोसले,

आयुक्त, पुणे महापालिका

आतापर्यंत अनेक कारणांनी रस्त्याचे काम रखडले आहे. मात्र, आता निधी मिळाला आहे तर जागामालकांना कागदपत्रांच्या क्लिष्ट प्रक्रियेत न अडकवता त्वरित मोबदला देत जागा ताब्यात घ्याव्यात आणि पालिकेने भूसंपादन करावे. जेणेकरून रस्त्याच्या कामाला गती मिळेल.

- उमेश आठल्ये, जागामालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Sangli DCC Bank : नातेवाइकांना कोट्यवधींची कर्जमाफी? नाबार्डच्या तपासणीत मोठा खुलासा, सांगली जिल्हा बँक अडचणीत, आमदार पडळकरांचा संचालकांवर गंभीर आरोप

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा व्रताच्या कथेचं पुस्तक नाहीये? मग व्रत परिपूर्ण करण्यासाठी वाचा सत्यवान-सावित्रीची कथा ऑनलाइन

IND vs IRE, T20I: 'अन् तिथेच आम्ही कमी पडलो', कर्णधार श्रेयस अय्यरने व्हाईटवॉशनंतर दिली कबुली

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

SCROLL FOR NEXT