पुणे

महिलेच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?

सचिन कोळी

कात्रज - व्यावसायिक दुकान गाळ्याला वीजजोड देताना सेवा वाहिनीची (सर्व्हिस केबल) बांधणी अशास्त्रीय पद्धतीने केल्यामुळे कात्रज चौकातील भाजी विक्रेत्या महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटूनही विद्युत निरीक्षकाचा अहवाल प्राप्त होण्यास झालेली दिरंगाई पोलिस कारवाईला आव्हान ठरत आहे.  

मंगळवारी दोन तारखेला कात्रज चौकात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महिलेचा विजेच्या धक्‍क्‍याने झालेल्या मृत्यूने एकच खळबळ उडाली होती. आगम टेकडी परिसरातील वाघजाईनगर येथे राहणाऱ्या अनिता वामन नाकाडे (वय ४५) या कात्रज चौकात गणेश पार्क या इमारतीसमोर भाजी विक्रीचा व्यवसाय अनेक वर्षे करीत होत्या. रात्री आठ वाजता घरी परतण्याच्या तयारीत होत्या. तत्पूर्वी त्या गणेश पार्क या सोसायटीच्या उत्तरेला एका मोकळ्या जागेकडे लघुशंकेसाठी गेल्या. त्या कुंपणाशेजारी टेंपोच्या आडोशाला अनिता गेल्या, त्याच वेळी त्यांचा स्पर्श तारेच्या कुंपणाला होताच त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर तीन तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र बंदनिमित्त कात्रज चौकात बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुंपणाच्या तारेला हात चिकटलेल्या अवस्थेतील अनिता यांना खबरदारी बाळगून बाजूला घेण्यात पोलिस यशस्वी झाले. कुंपणात वीजपुरवठा उतरल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कात्रज महावितरणला माहिती दिली. 

संबंधित ग्राहकाला वीजजोड देताना सेवा वाहिनीची बांधणी अशास्त्रीय पद्धतीने केल्याचे या निमित्ताने निदर्शनास आले. विजेचा खांब आणि ग्राहक यांच्यातील अंतर तब्बल शंभर फुटांहून अधिक आहे. परिणामी, सेवा वाहिनी अनेक महिने लोंबकळत होती. सेवा वाहिनी तारेच्या कुंपणाला घासून वीजरोधक आवरण निकामी झाले होते. त्यामुळे कुंपणात वीज उतरली होती.

अनिता नाकाडे या गेल्या सात वर्षांपासून कात्रज चौकात भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. त्यांचे पती वामन हे बिगारी काम करतात. चार मुलींपैकी तीन मुलींची लग्ने करण्यासाठी त्यांनी अनंत कष्ट उपसले होते. घटना घडली त्या वेळी त्यांचा मुलगा आणि सासू भाजी विक्रीच्या ठिकाणी बसून अनिताची प्रतीक्षा करीत होते. दरम्यान, त्याच परिसरात झालेल्या गर्दीकडे मुलाने धाव घेतल्यानंतर आपल्या आईचा मृत्यू झाल्याचे पाहून त्याने हंबरडा फोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

Latest Marathi News Updates : उर्दू माध्यमाच्या शाळेची दुरावस्था

R Madhavan Fitness Secrets: 55 व्या वर्षीही 'जोश' कायम! आर. माधवनचं तरुण दिसण्याचं हे आहे 'अस्सल' सिक्रेट

SCROLL FOR NEXT