katraj zoo hyenas leopard four-horned antelope tourist pune
katraj zoo hyenas leopard four-horned antelope tourist pune Sakal
पुणे

Katraj Zoo : कात्रज प्राणी संग्रहालयात चौशिंगे दाखल; दोन तरस आणि एक बिबट्याचाही समावेश; पर्यटकांसाठी पर्वणी

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात चार चौशिंगे दाखल झाले असून त्यांना पर्यटकांच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी ते खुले करण्यात आले आहे. छत्तीसगढ वन विभागाकडून भेट स्वरूपात देण्यात आलेल्या चौशिंग्याचा दोन जोड्या बिलासपूर येथिल कानन पेंढारी प्राणी संग्रहालयातून आणण्यात आल्या आहेत.

या दोन जोड्यांसह संग्रहलयात आता चौशिंग्याची संख्या आठ झाली आहे. नवीन बांधण्यात आलेल्या खंदकात त्यांना सोडण्यात आले आहे.त्याचबरोबर, डिसेंबर महिन्यात दोन तरस आणि एक बिबट्याही कर्नाटक वनविभागाकडून मिळाला आहे.

हंपीच्या अटल बिहारी वाजपेयी प्राणी संग्रहालयातील हे प्राणी असून कात्रज प्राणीसंग्रहालयाने केलेल्या मागणीनुसार भेट स्वरुपात मिळाले आहेत. या प्राण्यांचा विलगीकरणाचा काळ संपला असून ते स्थनिक वातावरणात स्थिरावले आहेत.

यांच्या समावेशानंतर प्राणी संग्रहालयात आता एकूण बिबट्याची संख्या ही चार झाली आहे. यामध्ये तीन मादी तर एका नर जातीच्या बिबट्याचा समावेश आहे. तर एकूण तरसांची संख्या ही तीन झाली आहे. या प्राण्यांसह सिंह, वाघ, हत्ती, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, शेकरू, रानमांजर, वाघाटी आदी प्राणी पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

आणखी एक सिंह होणार दाखल

आगामी काळात हरियाणा राज्यातील रोहतक प्राणी संग्रहालयातून मादी सिंह आण्यात येणार आहे. त्याची परवानगी घेण्याचे काम सुरु असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करुन मादी सिंह कात्रज प्राणीसंग्रहालयात दाखल होईल.

त्याचबरोबर, पिसोरी हरणाच्या आणि लायन टेल्ड मकाकच्याही (एका प्रकारचे माकड) खंदाकाचे काम सुरू आहे. पुढील सहा महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर हे प्राणी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिली.

पर्यटकांसाठी जास्तीत जास्त प्राणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने भविष्यात आणखी चांगले प्राणी प्रदर्शनासाठी आणण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, कात्रज

प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी पहायला मिळतात. अनेकवेळा चित्रात किंवा टीव्ही, मोबाईलवर पाहिलेले प्राणी प्रत्यक्षात पाहता येत असल्याचा आनंद वेगळाच असतो.

- माधवी भोंडवे, पर्यटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT