पुणे

मॉन्सून २६ मेपर्यंत केरळात पोहोचणार

CD

पुणे, ता. १५ : एकीकडे ‘एल-निनो’च्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सूनविषयी चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे उष्णतेच्या वाढलेल्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत, अशातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सून यंदा २६ मेपर्यंत केरळात दाखल होणार आहे, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचे केरळातील आगमन हे देशातील पावसाळ्याच्या अधिकृत सुरुवातीचे संकेत मानले जाते.
साधारणपणे नैर्ऋत्य मोसमी वारे एक जूनच्या आसपास केरळात पोहोचतात. मात्र, यंदा ते काही दिवस आधीच केरळ मार्गे भारतात दाखल होतील, असे सूतोवाच हवामानशास्त्र विभागाने केले आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान भारतात यावर्षी ९२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत यंदा पाच टक्के कमी-अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी वारे २६ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होतील. या अंदाजानुसार मॉन्सूनचे आगमन २६ मेच्या चार दिवस मागे-पुढे होऊ शकते. बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे आणि अंदमान-निकोबारमध्ये पुढील २४ तासांत मॉन्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, तमिळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटकात पुढील तीन ते चार दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
मॉन्सूनच्या केरळातील आगमनाची तारीख ही प्राथमिक अंदाजावर आधारित असून, वातावरणातील बदलांनुसार त्यात काही प्रमाणात फरक पडू शकतो. पुढील काही दिवसांतील हवामान स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.

गेल्या काही वर्षांत ‘मॉन्सून’च्या आगमन
वर्ष : प्रत्यक्ष ‘मॉन्सून’चे आगमन
२०२० : १ जून
२०२१ : ३ जून
२०२२ : २९ मे
२०२३ : ८ मे
२०२४ : ३० मे
२०२५ : २४ मे

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT