पुणे

अर्धवट बांधकामाप्रकरणी कंपनीवर कारवाई

CD

वाघोली, ता. २९ : केसनंद येथील वडिलोपार्जित जमिनीवर इमारत बांधण्यासाठी घेतलेले ३४ लाख रुपये मिळूनही बांधकाम पूर्ण केले नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पुण्यातील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्रमांक-६ यांनी वाघोली पोलिसांना दिले आहेत.
वाघोलीतील येथील निर्मला शिंदे यांनी स्वर्ग कन्स्ट्रक्शन प्रा. लि.व इतरांविरोधात ॲड. संजय ढाकणे यांच्यामार्फत अंतर्गत अर्ज दाखल केला होता. न्यायालयीन आदेशानुसार, अर्जदार व त्यांच्या बहिणीची केसनंदमध्ये वडिलोपार्जित जमीन असून, या जमिनीवर इमारत बांधण्यासाठी स्वर्ग कन्स्ट्रक्शनसोबत नोटरीकृत करार करण्यात आला होता. बांधकामाच्या प्रगतीनुसार बांधकामाची रक्कम हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले होते. त्यानुसार अर्जदाराने ३४ लाख रुपये दिले. ही रक्कम बांधकाम कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आली होती. मात्र, पैसे देऊनही बांधकाम पूर्ण करण्यात आले नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.
न्यायालयाने करार व इतर कागदपत्रांचा विचार करून या प्रकरणात दखलपात्र गुन्ह्याची माहिती असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच सुरुवातीपासूनच फसवणुकीचा हेतू होता का, याचा पोलिस तपास आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यानुसार वाघोली पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paradh News : कठीण संघर्षातून गजानन तबडे याचे यश! बृहन्मुंबई महापालिकेत पदवीधर शिक्षक म्हणून झाली निवड

Maharashtra Monsoon Prediction : भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधी पक्षनेते आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना पत्र लिहिले

Urulikanchan ATS Action: उरुळीकांचनमध्ये गावठी पिस्तूल, काडतुसे व कोयतेसह रेकॉर्डवरील गुन्हेगार एटीएसच्या जाळ्यात

गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? धनंजय महाडिक यांनी एका वाक्यात कंडका पाडला, सतेज पाटलांच्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटींवरूनही टीका

Teacher Selection: कुकटोळीच्या विवेकन वाघमारे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT