खडकवासला - हिंदू जनजागृती समितीने धूलिवंदनानिमित्त खडकवासला जलाशयाचे रक्षण केले. रंग खेळून पाण्यात अंघोळीसाठी येणाऱ्यांना रोखण्यासाठी गुरुवारी केलेली मानवी साखळी.
खडकवासला - हिंदू जनजागृती समितीने धूलिवंदनानिमित्त खडकवासला जलाशयाचे रक्षण केले. रंग खेळून पाण्यात अंघोळीसाठी येणाऱ्यांना रोखण्यासाठी गुरुवारी केलेली मानवी साखळी. 
पुणे

खडकवासला जलाशयाचे मानवी साखळीतून रक्षण

सकाळवृत्तसेवा

खडकवासला - हिंदू जनजागृती समितीने मानवी साखळी करून  धूलिवंदनानिमित्त खडकवासला जलाशयाचे रक्षण केले. समितीच्या साधकांनी गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ही मोहीम राबविली.

श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व जलदेवतेची प्रार्थना करण्यात आली.  हभप विद्यानंद सांगळे महाराज, उपसरपंच सीमा मते, शांताराम मते, पाटबंधारे विभागाचे धुंडीराम भागवत, ग्रामपंचायत सदस्य आशा मते, हभप ज्ञानेश्‍वर महाराज मते, हभप दशरथ मते, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले आदी उपस्थित होते. गेल्या १७ वर्षांपासून धूलिवंदन व रंगपंचमीला ही मोहीम राबवली जाते. खडकवासला, गोऱ्हे बुद्रुकचे ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी, कमिन्स इंडिया लिमिटेडचे कर्मचारी सहभागी होत आहेत. सदस्यांनी प्रबोधनात्मक फलक हाती घेतले होते. एकही रंग खेळलेला नागरिक धरणाच्या पाण्यात उतरला नाही. रंगाने माखलेल्या युवक-युवतींना परत पाठविले. हवेली पोलिस ठाण्याचे अभियानाला सहकार्य लाभले.

रंगपंचमीला (२५ मार्चला) पुन्हा हे अभियान राबवण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने धरण परिसरात पाणी दूषित न करण्याचे आवाहन केले.

सामाजिक बांधिलकी म्हणून हे अभियान राबवण्यात येत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी सणांच्या निमित्ताने उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार दूर होण्याची गरज आहे.
- पराग गोखले, हिंदू जनजागृती समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT