Supriya Sule sakal
पुणे

Supriya Sule : बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल ते वारजे व चांदनी चौक ते रावेत येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला - मुंबई- बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे.

यासोबतच कोथरूड ते मुळशी दरम्यान भुयारी मार्ग आणि पूल तसेच सेवा रस्त्यांचे काम लवकरच सुरू होत आहे. अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली.

या रस्त्यांबाबतच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी सुळे यांनी आज शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल ते वारजे व चांदनी चौक ते रावेत येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याला सकारात्मक प्रतिसाद देत नीतीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. असे यावेळी सांगण्यात आले.

वडगाव आणि वारजे पुलासह सेवा रस्त्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर

यासोबतच कोथरुड ते मुळशी भुयारी मार्गाचे कामही लवकरच सुरु होत असून वडगाव येथील पुलासह वारजे येथील मुठा नदीवरील पुल आणि दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम करण्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या सर्व कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले असून ही सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण होऊन या भागातील दळणवळण अधिक सुसह्य आणि सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT