khadakwasla dam was polluted by the tourists
khadakwasla dam was polluted by the tourists 
पुणे

पर्यटकांकडून  ‘खडकवासला’ होतेय प्रदूषित

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी - लाखो पुणेकरांना पाणीपुरवठा करणारे खडकवासला हे अत्यंत महत्त्वाचे धरण पर्यटकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे प्रदूषित होताना दिसत आहे. धरणाच्या पाण्यावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रिकामे पॅकेट, शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या तरंगताना दिसत आहेत. खडकवासला धरणाच्या भिंतीजवळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्याचा तवंग आलेला दिसत आहे. 

सिंहगड, पानशेत, खडकवासला या भागात सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या भागात येणारे पर्यटक खडकवासला धरणाच्या तीरावर थांबतात. बरोबर आणलेली शीतपेये, पाणी बाटल्या, खाद्यपदार्थांचा वापर झाल्यानंतर उरलेला कचरा थेट धरणाच्या पाण्यामध्ये फेकतात. कित्येक पर्यटक धरणाच्या कडेला बसून स्वतःच्या सुटीचा आनंद घेतात; मात्र त्यांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे लाखो पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसत आहे.

काही तरुण-तरुणी रात्रीच्या वेळी धरणाच्या कडेला बसूनच मद्यप्राशन करतात व रिकाम्या बाटल्या धरणाच्या पाण्यात फेकतात. अशा अपप्रवृत्तींमुळे सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत आहे. प्रशासनाने धरण परिसरात अशा समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. धरणावर काम करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कित्येक वेळा भिंतीजवळ आलेला कचरा काढला आहे. कर्मचाऱ्यांनी काढलेले कचऱ्याचे ढीग दिसत आहेत; परंतु पर्यटकांची संख्या जास्त असल्याने कचऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. 

पर्यटकांना कितीही सांगितले तरी ते ऐकत नाहीत. कचरा असाच वाढत गेला तर पाणी दूषित होऊ शकते व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,’ असे धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT