पुणे

खंडाळा - खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगदा व उड्डाणपुलाचे काम लवकर करा - नितीन गडकरी

CD

‘खंबाटकी’तील उर्वरित कामे पूर्ण करा

नितीन गडकरींच्या सूचना; नवीन बोगदा, महामार्गाची केली पाहणी

खंडाळा, ता. १५ : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम व उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केल्या.
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा व महामार्गाची पाहणी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, एनएचएआयचे अधिकारी अंकित यादव, सुभाष घंटे, सत्यजित निंबाळकर व श्री. जाधव तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक श्री. साळुंखे, पोलिस निरीक्षक सुनील शेळके, श्री. ताटे, संतोष म्हस्के, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक श्याम गोरड, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भुईंज येथील नियोजित कार्यक्रम संपल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना मंत्री गडकरी यांचा ताफा खंबाटकी घाटात थांबला. यावेळी त्यांनी सातारा- पुणे महामार्गावरील नवीन खंबाटकी बोगदा व कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुणे- सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील दुसऱ्या नवीन बोगद्याचे व उड्डाणपुलाचे तसेच रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्याच्या कडक सूचना एनएचएआयला केल्या, तसेच पुणे- सातारा महामार्गावरील उर्वरित कामेही लवकर पूर्ण करा, अशा सूचना केल्या. यावेळी खंबाटकी घाटातील सातारा- पुणे महामार्गावरील नवीन बोगद्यातील विजेची सोय व इतर कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
---------------------------
06216
वेळे : खंबाटकी घाटातील नवीन बोगदा व महामार्ग रस्त्याची पाहणी करताना मंत्री नितीन गडकरी. त्या वेळी अधिकारी, पोलिस व इतर.
------------------------------

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT